निर्गुण मठ योगीधाम
     ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय
   
ॐ नमः शिवाय
   
पुढील उत्सव : - २७/०६/२०२२ नाथांचा दरबार (सोमवार)     
     
  
About Us
         
♨योगीधाम स्थानाविषयी परिचय♨
    आपण सर्व भक्तगण श्रद्धेने, भक्तीपूर्वक अनेक तीर्थक्षेत्रांची यात्रा करत असतो. त्यामुळे आपल्याला हे तर माहिती आहेच कि प्रत्येक तिर्थक्षेत्रांची तेथे स्थापित असणाऱ्या देवतेमुळे वेगवेगळी महती झालेली आहे. त्याचप्रमाणे योगीधाम शिवमंदिराचीही वेगळी महती आहे. या मंदिरात संपूर्ण त्रिभुवनाचे नाथ असणाऱ्या श्री महादेवांची "श्री पशुपतीनाथ रुपी मूर्ती" स्थापित आहे कि ज्या मूर्तीमध्ये आजपर्यंत अनेक भक्तगणांना साक्षात श्री महादेवांच्या वास्तव्याची जाणीव झालेली आहे. आपणही भक्तिपूर्वक पाहिल्यास आपणालाही होईल. कारण भक्तीचे तत्वच सर्वश्रेष्ठ आहे हे आपल्याला ठाऊक आहेच. त्याचप्रमाणे या क्षेत्री मंदिरात गुरुपौर्णिमेच्या दिवशी साक्षात आदिगुरू श्री दत्तप्रभूंच्या औदुंबराचे उगम गुरुस्थानी झालेला आहे. या औदुंबर वृक्षाद्वारे साक्षात श्री दत्तप्रभू अनेक भक्तगणांना आपली साक्ष दाखवत असतात. या स्थानी जे विविध उत्सव संपन्न होत असतात त्यावेळी प्रति गाणगापूर स्वरूपी पालखी निघत असते त्या पालखीत साक्षात श्री दत्तप्रभूंच्या उत्सवमूर्ती तसेच साक्षात श्री महादेवांची शिवपिंड विराजमान असतात. या पालखीद्वारेही श्री दत्तप्रभू व श्री महादेव भक्तगणांना त्यांच्या अस्तित्वाची साक्ष दाखवत असतात. या पालखीची सेवा घेण्यासाठी सोवळे परिधान करण्याचा नियम आहे. जी पुरुषमंडळी सोवळे परिधान करून पालखीची सेवा घेतात त्यांना परिक्रमा जशी पुढे जाते तसे पालखीचे वजन पेलवत नाही हीच तर साक्षात परमेश्वराच्या अस्तित्वाची जाणीव होणे आहे.    त्याचप्रमाणे या मंदिरात गुरुस्थानी श्री नवनाथांपैकी आठवे नाथ श्री रेवणसिध्दनाथांची मूर्तीही स्थापित आहे व दर महिन्याच्या शेवटच्या सोमवारी व उत्सवाच्या दिवशी नाथांचा दरबारही या क्षेत्री होत असतो. या नाथांच्या दरबाराच्या दिवशी साक्षात श्री रेवणसिध्दनाथांच्या काठीचीही परिक्रमा मंदिराला होत असते. या काठीमध्येही साक्षात श्री रेवणसिध्दनाथांच्या अस्तित्वाची जाणीव काठी उचलणाऱ्या मुलांना होत असते. अशा प्रकारे हे तीर्थक्षेत्र परमेश्वराच्या आशीर्वादाने पावन झाले आहे. प. पु. शिवभक्त योगीजी (बाप्पा) हे या योगीधाम तीर्थक्षेत्राचे प्रमुख आहेत व त्यांच्याद्वारे अनेक भक्तगणांना भक्ती कशी करावी व भक्तीचे महत्व आपल्या जीवनात किती अनन्य साधारण आहे याची माहिती व मार्गदर्शन लाभत असते.
            

       निर्गुण मठ योगीधाममंदिराचे जीर्णोद्धाराचे काम प्रगतीपथावर असून भाविक भक्तांनी सढळ हाताने आर्थिक मदत करावी असे आवाहन देवस्थान ट्रस्टतर्फे करण्यात आले.

योगीधाम शिव मंदिर , तोंडलेकरवाडी , कोरी मार्गे , वनविभाग , करंबळी फाटा , ढालघर फाटा , मुंबई गोवा हायवे , ता. माणगाव , जि. रायगड , whatsup No.:7038147853 ,Phone No.:8459550921